Search
  • Nandkishor Dhekane

ज्ञानयोग


जीव,जगत व परब्रह्म यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या अभ्यासाने व गुरुच्या साहाय्याने करून घेवून त्यावरून ब्रह्म ऐक्य जाणणे आणि अनुभवणे याला ज्ञानयोग म्हणतात.न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते म्हणजे ज्ञानासारखे पवित्र इथे काहीही नाही असे गीतेत (४.३८) सांगितले आहे. हे पवित्रतम ज्ञान तत्वदर्शी गुरुच्या साहाय्याने स्वतः स्वतःच अनुभवायचे असते. ज्ञान मिळविण्यासाठी तत्वदर्शी गुरूकडे नम्रतेने जायला हवे.अहंकारी मनुष्याला ज्ञान प्राप्त होण्याचा संभव नाही.ज्ञानप्राप्तीसाठी साधकाला तीव्र जिज्ञासा असली पाहिजे आणि त्याने गुरुची सेवा करीत योग्य समयाची वाट पाहिली पाहिजे.ज्ञानासाठी श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे.बुद्धीनिष्ठा ही एक प्रकारची श्रद्धाच आहे. ज्ञानयोगाला तत्परताही आवश्यकता असते

प्रा.खानोलकर यांनी ज्ञानयोगाच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे ते असे-मानवी जीविताचे मर्म ज्यांना समजले आहे,जीविताच्या पाठीमागचा हेतू ज्यांना आकलन झाला आहे,शरीर-मन-बुद्धी यांचा विकास होवून ज्यांच्या ठिकाणी स्थितप्रज्ञवृत्ती स्थिर झाली आहे,निष्काम कर्मयोग ज्यांना साधला आहे त्यांनाच बुद्धियोग साधतो ,ज्ञान प्राप्त होते,तेच भगवंताला प्रिय होतात . हाच ज्ञानयोग होय

गीतेत ज्ञानयोगालाच बुद्धियोग असे नाव दिले आहे.या योगात शरीर व मन यांच्यापेक्षा बुद्धीचा संबंध जास्त येतो.बुद्धीने आत्म स्वरूपाची खरी ओळख करून घेणे म्हणजे ज्ञान मिळविणे होय.या बुद्धीयोगाचे महत्त्व गीतेत अनेक जागी सांगितले आहे.

ज्ञानाचा अधिकारी होण्यासाठी मुमुक्षूने म्हणजे मोक्षाची इच्छा असणा-याने प्रथम चार साधने संपादित केली पाहिजेत.नित्यानित्यविवेक,इहामुत्रफलभोगविराग .यमनियम व मुमुक्षुता ही ती चार साधने होत. ज्ञानयोगाच्या सात भूमिका असून शुभेच्छा,विचारणा,तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थभावना व तुर्यगा अशी त्यांची नावे आहेत


ईश्वरप्राप्तीच्या विविध साधनामार्गांतील ज्ञानयोग हा एक मार्ग आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास आणि आचरण करून ईश्वरप्राप्ती करणे, ही ज्ञानयोग्याची साधना आहे. या योगमार्गाविषयी माहिती जाणून घेऊ.

१. हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास म्हणजे ज्ञानयोग

हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या ऋषिमुनींनी हिंदु धर्माची महती, वैशिष्ट्ये आणि आचारधर्माचे नियम यांचे विस्तृत विवेचन केले आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, दर्शने, स्मृति, ऋचा, रामायण, श्रीमद्भगवतगीता, दासबोध हे आपले प्रमुख धर्मग्रंथ आहेत. या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून ईश्वरप्राप्ती करणे, म्हणजे ज्ञानयोग या योगाची साधना आहे.

२. धर्माविषयीचे लिखाण ब्रह्माविषयी असल्याने आपले धर्मग्रंथ काळावर मात करणारे असणे

धर्माविषयीचे लिखाण ब्रह्मासंबंधी असल्याने आणि ब्रह्म अनादि-अनंत असल्याने ते लिखाणही अनंत काळ टिकते. म्हणूनच आपले धर्मग्रंथ काळावर मात करणारे ठरले आहेत.

३. सत्ययुगात जीव निर्गुणाच्या संपर्कात असलेले सगुण स्वरूपच असल्याने त्याला ईश्वराच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाणे ज्ञानयोगाच्या माध्यमातून शक्य असणे

ज्ञानयोग हा ज्ञानशक्तीतील सगुणता, म्हणजेच शब्दबद्धतेच्या किंवा आकलनात्मक मायेच्या माध्यमातून ज्ञानशक्तीतील निर्गुणतेला प्रगट करतो. (शब्द ज्ञानाशी संबंधित आहेत. त्यांची स्वत:ची एक शक्ती असते. शब्दांना पहाणे सगुणाशी संबंधित, तर त्यांचे आकलन होणे हे निर्गुणाशी संबंधित आहे.) सत्ययुगात जीव निर्गुणाच्या संपर्कात असलेले सगुण स्वरूपच असल्यामुळे त्याला निर्गुणतेकडे, म्हणजेच ईश्वराच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाणे ज्ञानयोगाच्या माध्यमातून शक्य झाले.

३. सत्ययुगात जीव निर्गुणाच्या संपर्कात असलेले सगुण स्वरूपच असल्याने त्याला ईश्वराच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाणे ज्ञानयोगाच्या माध्यमातून शक्य असणे

ज्ञानयोग हा ज्ञानशक्तीतील सगुणता, म्हणजेच शब्दबद्धतेच्या किंवा आकलनात्मक मायेच्या माध्यमातून ज्ञानशक्तीतील निर्गुणतेला प्रगट करतो. (शब्द ज्ञानाशी संबंधित आहेत. त्यांची स्वत:ची एक शक्ती असते. शब्दांना पहाणे सगुणाशी संबंधित, तर त्यांचे आकलन होणे हे निर्गुणाशी संबंधित आहे.) सत्ययुगात जीव निर्गुणाच्या संपर्कात असलेले सगुण स्वरूपच असल्यामुळे त्याला निर्गुणतेकडे, म्हणजेच ईश्वराच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाणे ज्ञानयोगाच्या माध्यमातून शक्य झाले.

५. ज्ञानयोग : अध्यात्माचे मर्म

‘अध्यात्म’ हे ज्ञानयोगाचे मर्म आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म’

६. ज्ञानयोग : सुखदुःखाची कारणे

ज्ञानयोगात सुख-दुःख असे काही नाही, सर्व ब्रह्मच आहे.

७. ज्ञानयोग यामध्ये सात्त्विक बुद्धी आवश्यक असल्याने कलियुगात या मार्गाने साधना करणे कठीण असणे

या मार्गाने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मानवाची बुद्धी अतिशय सात्त्विक असावी लागते. अशी सात्त्विक बुद्धी सत्ययुगातील मानवाची होती; कारण सर्वजण ‘सोहं’ भावात असत. कलियुगातील मानवाची सात्त्विकता अल्प (कमी) असल्याने या मार्गाने साधना करणे कठीण आहे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘साधना (सर्वसाधारण विवेचन)’


0 views0 comments

Recent Posts

See All

आपले आचार विचार

आपण आत्ता पर्यंत पहिले कि जीवनात बाह्य घटकांकडून आपण जे काही शिकतो ते अडचण म्हणून प्राप्त जीवनात कसे कार्य करते. ह्या आधी आपण पहिले कि आपल्या देहाची धारणा आणि आपले आचार विचार उच्चार ह्यांचा आपल्या प्र